वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना-अमृत व्याज परतावा योजना ब्राम्हण समाजसाठी तसेच इतर
योजनेचा उद्देश
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणे. ज्या समाजघटकांना इतर कोणत्याही शासकीय संस्था/महामंडळाच्या योजना उपलब्ध नाहीत, त्यांना या योजनेतून मदत मिळते.
कोण अर्ज करू शकतो?
-
अमृत संस्थेच्या लाभार्थी निकषांत बसणारे उमेदवार.
-
ज्यांच्याकडे आवश्यक व्यवसाय परवाने, उद्यम आधार प्रमाणपत्र आहे.
-
ज्यांनी व्यवसाय/उद्योगाचे प्रशिक्षण घेतले आहे (प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास जोडणे आवश्यक).
-
अर्जदाराचे PAN व आधार कार्ड -लिंक आसने गरजेचे तसेच बँक खाते असणे आवश्यक.
- अर्जदार कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.दवारांना प्राधान्य.
महत्त्वाच्या अटी व शर्ती
1 कर्ज राष्ट्रीयकृत, सहकारी, जिल्हा मध्यवर्ती, खाजगी किंवा इतर आरबीआय मान्यताप्राप्त बँकेकडून घ्यावे.
2 अर्जदारास या व्याज परतावा योजनेतून किंवा परशुराम गट व्याज परतावा योजनेतून – फक्त एका योजनेचा लाभ घेता येईल.
3 कर्जाचे हप्ते वेळेवर व नियमित भरले गेले पाहिजेत. विलंब झाल्यास व्याज परतावा दिला जाणार नाही.
4 स्वयंरोजगार व कृषीआधारित उद्योग प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
अर्ज करण्याची प्रक्रिया
1 अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahaamrut.org.in जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा.
2 आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
3 अर्जाची प्रिंट काढून स्वाक्षरी करून, आवश्यक दस्तऐवजांच्या स्व-प्रमाणित प्रतींसह अमृत कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.
योजनेतील लाभ
1 बँकेकडून घेतलेल्या कर्जावरील फक्त व्याजाची रक्कम अमृत संस्था परत करते.
2 परतावा देताना बँकेचा व्याजदर किंवा योजनेंतर्गत निश्चित केलेली उच्चतम मर्यादा (१२% पर्यंत) यापैकी जे कमी असेल त्यानुसार व्याज दिले जाते.
3 बँकेने आकारलेले इतर शुल्क/चार्जेस या योजनेत समाविष्ट होत नाहीत.
🎯 योजनेचा लक्षगट
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवती व इच्छुक उमेदवार.
लक्षित गटातील जाती पुढीलप्रमाणे आहेत –
ब्राह्मण,बनिया,राजपुरोहित,कम्मा,कायस्थ,ऐयांगर,नायर,नायडू,पाटीदार,बंगाली,पटेल,येलमार,मारवाडी,ठाकूर,त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,सिंधी,कानबी,राजपूत,कोमटी (आर्य वैश्य)
✅ लाभार्थी निवड निकष
1 उमेदवार अमृत लक्षित गटातील जातीचा असावा, महाराष्ट्र राज्याचा अधिवासी (Domicile) असावा, उत्पन्न मर्यादा ८ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक.
2 वयोमर्यादा : किमान १८ वर्ष.
3 शैक्षणिक पात्रता : १० लाखांपर्यंतच्या उद्योग व्यवसायासाठी किमान ८ वी पास.
📝 लाभासाठी अर्ज करण्याची पद्धत
लाभार्थी यांनी अमृत संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करून “अमृत लघुउद्योजक स्वयंरोजगार प्रोत्साहन व प्रशिक्षण योजना” या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा.
अर्जासोबत खालील कागदपत्रे आवश्यक आहेत –
महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याचे प्रमाणपत्र (Domicile Certificate – तहसीलदारांद्वारे दिलेले)
उत्पन्न प्रमाणपत्र (८ लाखांपेक्षा कमी, चालू आर्थिक वर्षातील – तहसीलदार)
जातीचा दाखला (लक्षित गटातील जातीचा असल्याचा पुरावा)
शैक्षणिक पात्रतेचा दाखला (किमान ८ वी उत्तीर्ण)
ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड)
पासपोर्ट साईज फोटो
📌 सूचना : वरील माहिती ही फक्त मार्गदर्शनाकरिता आहे. अधिकृत अटी, शर्ती व ताज्या अपडेट्ससाठी कृपया अमृत संस्थेची वेबसाईट आणि आपण ज्या बँक मधून कर्ज घेणार आहे त्याबँकेची वेबसाईट पहा.

