PMMY — लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्धतेचा सुवर्ण संधी

Pradhan Mantri MUDRA Yojana द्वारे मिळवा ₹10 लाखांपर्यंत कर्ज — कोणतीही हमी नाही, फक्त तुमचा आत्मविश्वास!”
योजने बाबत परिचय
PMMY ही केंद्र सरकारद्वारे सुरु केलेली योजना आहे, ज्यामध्ये “फंडिंग द अनफंडेड” हा मूळ उद्देश आहे. म्हणजे, ज्यांनी व्यवसाय सुरु करायचा आहे किंवा चालू उद्योग वाढवायचा आहे, पण पुरेशी आर्थिक मदत मिळाली नसलेली आहे — अशा लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना या योजनेतून कर्जाची मदत मिळते.
योजनेची अधिक माहिती किंवा पात्रता तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ: https://www.mudra.org.in
पात्रता काय आहे
व्यवसाय (मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, सर्व्हिसेस) चालू आहे किंवा सुरु करायचा आहे, पण कर्जाची गरज आहे.
कर्जाची मर्यादा ₹10 लाखांपर्यंत (Tarun पर्यंत) आहे.
कोणत्याही मोठ्या कर्ज-दस्तऐवजांची पूर्वअट नसते (बहुतेक वेळा गहाण माल नको असतो) — बँक/संस्थेच्या अटीनुसार निर्णय.
कर्ज प्रकार (तीन श्रेण्या)
Shishu: ₹50,000 पर्यंत — व्यवसायाची सुरुवात करणाऱ्यांसाठी.
Kishore: ₹50,001 ते ₹5 लाख.
Tarun: ₹5,00,001 ते ₹10 लाख.
या योजनेचे फायदे व उद्देश
सूक्ष्म-लघु उद्योगांना सहज प्रवेशयोग्य कर्ज मिळण्याची संधी.
व्यवसाय सुरु करण्यास किंवा विस्तार करण्यास आर्थिक मदत.
अनेक सार्वजनिक व खाजगी बँका, RRBs, सहकारी बँका व NBFC / MFI या योजनेच्या अंतर्गत आहेत — त्यामुळे स्थानिक बँकेत किंवा शाखेत सल्ला मिळवणे अधिक सोपे.
गहाण माल नको असण्याची शक्यता याबाबत बँक निर्णय घेते (कर्ज मर्यादेनुसार) — त्यामुळे नव-उद्योग सुरु करणाऱ्यांसाठी सोयीची.
कर्ज कोणत्या बँक देऊ शकतात
PMMY अंतर्गत असणाऱ्या सरकारी, सार्वजनिक, खाजगी, ग्रामीण बँका, सहकारी बँका, NBFCs / MFIs अशा अनेक संस्था सहभागी आहेत. हे सर्व त्या त्या बँकेवर डिपेंड राहील..
📌 सूचना : वरील माहिती ही फक्त मार्गदर्शनाकरिता आहे. अधिकृत अटी, शर्ती व ताज्या अपडेट्ससाठी संस्थेची वेबसाईट आणि आपण ज्या बँक मधून कर्ज घेणार आहे त्याबँकेची वेबसाईट पहा.- अधिक माहितीकरिता खाली दिलेल्याया संकेतस्थळास भेट द्यावी.
वेबसाईटसाठी लिक
अधिकृत माहिती व अर्जासाठी: https://www.mudra.org.in
