मुख्यमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम (CMEGP)
१. योजना परिचय
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे.
या योजनेद्वारे ग्रामीण व शहरी भागातील युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी
बँक कर्ज आणि अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते.
ही योजना महाराष्ट्र राज्य उद्योग संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या माध्यमातून राबविली जाते.
२. उद्दिष्टे
– राज्यात नवीन उद्योग स्थापन करून रोजगारनिर्मिती करणे.
– युवक-युवतींना आत्मनिर्भर बनवून स्वयंरोजगार प्रकल्प स्थापन करणे.
– पारंपरिक कारीगर आणि उद्योजकांना प्रोत्साहन देणे.
– ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगारी कमी करणे.
– युवक आणि महिलांना स्वावलंबी बनविणे.
३. पात्रता
– महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.
– वय १८ ते ४५ वर्षे (आरक्षित प्रवर्गासाठी ५ वर्ष सूट).
– रुपये १० लाख वरील प्रकल्पासाठी किमान शैक्षणिक पात्रता – ७वी उत्तीर्ण.
– रुपये २५ लाख वरील प्रकल्पासाठी किमान शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण.
– एका कुटुंबातील केवळ एक व्यक्तीला योजनेचा लाभ मिळू शकतो.
– इतर कोणत्याही अनुदानित योजनेचा पूर्वी लाभ घेतलेला नसावा.
४. अनुदान व वित्तीय सहाय्य
– उत्पादन क्षेत्रासाठी प्रकल्प खर्च ५० लाखांपर्यंत.
– सेवा क्षेत्रासाठी प्रकल्प खर्च १० लाखांपर्यंत.
– ग्रामीण भाग: सामान्य प्रवर्गासाठी २५% अनुदान, विशेष प्रवर्गासाठी ३५%.
– शहरी भाग: सामान्य प्रवर्गासाठी २०% अनुदान, विशेष प्रवर्गासाठी ३०%.
– उर्वरित रक्कम बँक कर्जाच्या स्वरूपात दिली जाते.
५. अर्ज प्रक्रिया
१. अर्ज maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावा.
२. प्रकल्प अहवाल, ओळखपत्र, पत्ता पुरावा जोडावा, जन्म दाखला, वयाचा पुरावा, आधार कार्ड,
३. पात्रतेची पडताळणी झाल्यानंतर बँकेकडे प्रस्ताव पाठविला जातो., व्यवसाय जागेबाबत दस्त, जात प्रमाणपत्र
४. अर्जदाराने उद्यमशीलता विकास प्रशिक्षण (EDP Training) पूर्ण करणे आवश्यक आहे.
५. मंजुरीनंतर बँक कर्ज व अनुदान वितरीत करते., स्वघोषित शपथपत्र
६. अमलबजावणी
१. राज्यस्तरावर उद्योग संचालनालय, मुंबई
२. ग्रामीण भाग- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ.
३. शहरी भाग- जिल्हा उधोग केंद्र
७. ❌ नकारात्मक व्यवसायांची यादी
योजनेचे अधिकृत मार्गदर्शकात पुढील व्यवसाय लाभार्थ्यांसाठी पात्र नाहीत, असे नमूद केले आहे:
मांस प्रक्रिया उद्योग (Meat processing)
कॅनिंगशी संबंधित उद्योग
बीडी, पान, सिगार उद्योग
मद्य विक्री करणारे हॉटेल / धाबा
शेती पिके, चहा, कॉफी, रेशीम, हॉर्टिकल्चर, फुलशेती
पशुपालन, कुक्कुट पालन इत्यादी (पशु/पालन व्यवसाय) अजून इतर पण असू शकतात.
८. लाभार्थी गट उद्योजकाचा सहभाग बँक कर्ज अनुदान (शहरी) अनुदान (ग्रामीण)
सर्वसाधारण गट 10% 75% 15% 25%
विशेष गट 05% 70% 25% 35%
अनु.जाती, अनु.जनजाती, इतर मागासवर्गीय, महिला, माजी सैनिक, शारीरिकदृष्ट्या अपंग (Divayang),
NER (North Eastern Region), डोंगरी व सीमाभागातील लाभार्थी इत्यादी.
(विशेष गटामध्ये SC/ST/OBC/महिला/अपंग/माजी सैनिक यांचा समावेश आहे.)
९. विशेष बाबी
या योजना प्रशासकीय सीमांवर (Administrative boundaries) आधारित आहेत, लोकसंख्येवर नाहीत.
म्हणजे — जर एखादं गाव ग्रामपंचायत हद्दीत असेल,
तर ते ग्रामीण भाग (Rural area) म्हणून धरले जाते,
अगदी त्याची लोकसंख्या ३०,००० किंवा ५०,००० असली तरीसुद्धा.
– बँकेकडून CGTMSE अंतर्गत हमी मिळू शकते.
– योजना वेळोवेळी शासन निर्देशांनुसार सुधारित केली जाते.
📌 सूचना : वरील माहिती ही फक्त मार्गदर्शनाकरिता आहे. अधिकृत अटी, शर्ती व ताज्या अपडेट्ससाठी कृपया मुख्यमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम (CMEGP) संस्थेची वेबसाईट आणि आपण ज्या बँक मधून कर्ज घेणार आहे त्याबँकेची वेबसाईट पहा.- अधिक माहितीकरिता www.maha-cmegp.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
